×
Homeताज्या बातम्याMumbai-Pune Highway | पोलिस प्रशासनाचा मोठा निर्णय ! जुना मुंबई-पुणे, नाशिक, सातारा...

Mumbai-Pune Highway | पोलिस प्रशासनाचा मोठा निर्णय ! जुना मुंबई-पुणे, नाशिक, सातारा महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) साते गावाजवळ झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पुणे ग्रामीणचे पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) आणि महामार्ग पोलीस (Highway Police) अधीक्षक संजय जाधव (SP Sanjay Jadhav) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) पहाटे चार ते सकाळी आठ पर्यंत अवजड वाहनांची (Heavy vehicle) वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर साते गावच्या हद्दीत वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो शिरून चार महिला वारकरी यांचा मृत्यू झाला होता, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा (Shri Dnyaneshwar Maharaj Samadhi Sohala) मंगळवारी (दि.30) रोजी संपन्न होत आहे.
यापार्श्वभूमीवर राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी श्री क्षेत्र आळंदी येथे दिंड्या घेऊन येतात.
मावळातील (Maval) साते गावाजवळ शनिवारी (दि.27) वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो शिरुन झालेल्या दुर्घटनेत 4 महिलांचा मृत्यू झाला.
तर 24 वारकरी जखमी झाला. या दुर्घटनेंतर समाधी सोहळा होईपर्यंत मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

जुना मुंबई-पुणे महामार्ग, नाशिक, सातारा महामार्गावरील अवजड वाहतूक पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने वारकरी मंगळवारी येणार आहे.
त्यांच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

 

Web Title : Mumbai-Pune Highway | Big decision of police administration! Heavy traffic on Old Mumbai-Pune, Nashik, Satara Highway closed from 4 am to 8 am

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jalgaon Crime | धक्कादायक ! सासू अन् सासर्‍याच्या छळाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Long Weekends 2022 | ‘या’ तारखांना येतील 2022 मधील ‘लाँग वीकेंड’, ऑगस्टमध्ये तर सुट्ट्याच-सुट्ट्या

Mouni Roy | मौनी रॉय झाली ‘Oops Moment’ची शिकार, बॅकलेस ड्रेस घालून कारमध्ये बसताना झाली कॅमेरामध्ये कैद..! पाहा व्हायरल व्हिडिओ 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News