मंकीहिलजवळ दरड कोसळल्याने पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील मंकीहिलजवळ दरड कोसळल्याने दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने दोन कामगार जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त असून दरड आज (सोमवार) दुपारी रेल्वे मार्गावर कोसळली आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या खोळांबल्या असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.


मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या रद्द होऊ शकतात. दरड कोसळण्याची ही महिन्याभरातील चौथी वेळ आहे. आजच्या घटनेत दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने काही गड्या थांबवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दरड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर रेल्वे प्रशासनाने काम सुरु केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रेल्वे रुळावर पडलेली दरड हटवण्याचे काम सुरु आहे. ही दरड हटवल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरु होणार आहे. मात्र, या मार्गावर दरड कोसळल्याने मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ