ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे रेल्वेसेवा मागील काही दिवसांपासून अधून मधून विस्कळीत होत होती. ती सुरळीत होत नाही तोच आज पुन्हा एकादा मोठा बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान इलेक्ट्रिक वायरमध्ये बिघाड झाल्याने मागील दोन तासांपासून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान डाऊन लाईनवर तिन ठिकाणी ओव्हरहेड वायर शॉर्ट सर्किट झाल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु आहे. या घटनेमुळे अनेक गाड्या खोळांबल्या आहेत.

या दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर नेहमीच वर्दळ असते. रोज पुणे- मुंबई ये-जा करणारे नोकरदारही असतात. ऐन संध्याकाळच्या वेळी गाड्या अडकून पडल्याने या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ठाकूरवाडी ते मंकीहिलदरम्यानचा भाग घाटाचा भाग आहे. तिथेच बिघाड झाल्याने दुरुस्तीला वेळ लागत असल्याचं समजतेय.

Visit : Policenama.com