Mumbai Pune Taxi | मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास महागला; 100 रुपयांची भाडेवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Pune Taxi | खटुवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आली आहे. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सीभाड्यात १०० रुपयांची वाढ केल्याने विमानतळाहून आता मुंबई-पुणे टॅक्सी (Mumbai Pune Taxi) प्रवास महागला आहे. नव्या भाडेवाढीमुळे वातानुकूलित टॅक्सीसाठी आता ४२५ ऐवजी ५२५, तर विनावातानुकूलित टॅक्सीसाठी ३५० ऐवजी ४५० रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. हि भाडेवाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे.

समितीच्या शिफारशीनुसार काळ्या-पिवळ्या टॅक्सीची प्रति किलोमीटर दर १६.९३ रुपये भाडेवाढ केली असून मुंबई-पुणे १५५ किलोमीटर  अंतराकरिता परिगणना केली असता प्रतिप्रवासी भाडे ६५६ रुपये, तर कुल कॅब टॅक्सी भाडेदरात वाढ करून प्रतिकिलोमीटर २२. २६ केले आहे. मुंबई-पुणे १५५ किलोमीटर अंतराकरिता परिगणना केल्यानंतर प्रतिप्रवासी भाडे ८६३ रुपये इतके येणार आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर २.९४ रुपये तर कुल कॅबसाठी प्रतिकिलोमीटर ४.८१ रुपये वाढविले आहे.

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला गैरव्यवहार

Pune Crime | पुण्यातील औंधमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविले

Sangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या संशयावरून ‘कुणाल’नं भावजय ‘सायली’ला संपवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Pune Taxi travel expensive increased 100 rs fare increase immediate effect

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update