मुंबई -पुणे ‘एक्सप्रेस-वे’वर टेम्पोचा भीषण अपघात, लघुशंकेसाठी थांबलेले 5 मित्र जागीच ठार

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन  – अलिबाग येथून परत येत असताना लघुशंकेसाठी थांबले असताना पुण्याकडून खोपोलीकडे जाणारा टेम्पो थांबलेल्या मोटरसायकल स्वारांवर उलटला. त्यात ५ जण जागीच ठार झाले.

अपघातात मयत झालेल्यांची नावे
प्रदीप प्रकाश चोले (वय- 38), अमोल बालाजी चिलमे (वय-30), नारायण रॅम गुंडाळे (वय -28), गोविंद न्यानोबा नलवाड आणि निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (वय-28, सर्व रा. वंजारवाडी, ता. अहमदपूऱ जि. लातूर) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.

या अपघातात बालाजी हरिशचंद्र भंडारे (वय ३५) हे एकटे बचावले आहेत. हा अपघात जुन्या महामार्गाकडे जाणार्‍या खंडाळा येथील अंडा पाॅईटजवळ रविवारी रात्री अकरा वाजता घडला. हे सर्व जण लातूर जिल्ह्यातील असून सध्या तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीत कामाला आहेत. रविवारी ते मोटारसायकलीवरुन अलिबाग येथे फिरायला गेले होते. तेथून परत येत असताना ते लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते.

त्यावेळी पुण्याहून मुंबईकडे पिठाच्या पोत्याची वाहतूक करणारा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटले व तो वरुन उलटला तो नेमका खाली थांबलेल्या या तरुणांच्या अंगावर पडला. त्याखाली हे सर्व जण दबले गेले. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वंयसेवी संस्थांचे सदस्य, देवदूत टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगार्‍याखाली अडकलेले मृतदेह काढून तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात रवाना केले़ मात्र, त्यातील पाच जणांचा मृत्यु झाला होता.