Mumbai-Pune Trains | खंडाळा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मान्सुनच्या पावसाने (Monsoon rains) जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती (Flood situation) निर्माण झाली आहे. कोकणात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सध्या सह्याद्रीच्या पट्ट्यात मान्सूनचा जोर कायम असून मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्प (Railway service disrupted) झाली आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरील (Mumbai-Pune Trains) खंडाळा घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यातील काही दरडी थेट मुंबई-पुणे लोहमार्गावर (Mumbai-Pune Trains) कोसळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरुच
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील दरडी हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु पावसाचा जोर कायम असल्याने दरडी हटवण्याच्या कामात अडथळा येत आहे. त्यातच घाट परिसरात सध्या जोरदार वारे वाहत असून दरडी कोसळण्याचा सिलसिला सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

महामार्गावरुन प्रवास करण्याचे आवाहन
रेल्वे मार्गावर पडलेल्या दरडी हटवण्याचे काम सुरु आहे. परंतु पावसाची स्थिती आणि दरडी कोसळण्याचं प्रमाण याचा विचार करुनच रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असे रेल्वे प्रशासनातील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रस्ते मार्गाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गरज असेल तर घराबाहेर पडा अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title :-Mumbai-Pune Trains | mumbai pune trains service stopped due to heavy rains

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे