Mumbai-Pune Trans Harbor Link Road | मुंबई ट्रान्स हर्बर लिंक रोडनं 90 मिनीटांत पुणे, वेळ अन् इंधनाची होणार बचत; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Trans Harbor Link Road | वेगवान वाहतुकीसाठी मुंबई – नवी मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हर्बर लिंक रोड आता मुंबई – पुणे एक्सप्रेस वेला (Mumbai-Pune Expressway) जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे अनेक शहरं मुंबईला वेगाने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाचा फायदा मुंबई – पुणे प्रवास (Mumbai-Pune Trans Harbor Link Road) करणाऱ्यांना होणार आहे. कारण या प्रकल्पामुळे मुंबईहून पुण्याला अवघ्या 90 मिनीटात पोहचता येणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. (Mumbai To Pune In 90 Min)

 

मुंबई ट्रान्स – हर्बर लिंक Mumbai Trans Harbour Link (MTHL), शिवडी आणि नाव्हा शेवा Jawaharlal Nehru Port Trust (JNPT) दरम्यानचा सागरी पूल (Sea Pool) 2024 च्या अखेरीस तयार होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास कमी वेळेत होणार आहे. एवढंच नाहीतर या महानगरातून पुणे आणि गोव्याकडे (Goa) कमी वेळेत पोहचता येणार आहे. ट्रान्स हार्बर शहरातील (Trans Harbor City) वाहतूक कोंडी (Traffic Jams) कमी करण्यास मदत होईल. तर नवी मुंबईतील आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. या लिंकमध्ये शिवडी, शिवाजी नगर (Shivaji Nagar) आणि चिर्ले (Chirle) येथे इंटरचेंज असणार आहे. (Mumbai-Pune Trans Harbor Link Road)

 

सध्याचा पुण्याला जाण्याचा मार्ग
पी. डी मेलो रोडवरुन (P.D. Melo Road) फ्री वे त्यानंतर सायन – पनवेल द्रुतगती मार्ग (Sion-Panvel Expressway) आणि मग तुम्ही मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करता येईल. यापुढे तुम्ही गोव्याकडेही प्रवास करु शकता. यामध्ये NH4, NH 748 असे दोन मार्ग लागतात. भविष्यात पुण्याला जाण्यासाठी पी. डी. मेलो रोडवरुन फ्री वे त्यानंतर (शिवडीच्या पुढे बाहेर पडावं लागणार) तुम्ही मुंबई ट्रान्स – हार्बर लिंक वरून पुढे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर चिर्ले मार्गाने प्रवास करु शकता.

लोणावळा व खंडाळ्यात कमी वेळेत पोहचणार
या प्रकल्पामुळे प्रवासातील एकूण 90 मिनिटं कमी होणार असून मुंबई आणि पुण्यासह लोणावळा (Lonavla) व खंडाळा (Khandala) यांसारख्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ लागेल. एवढंच नाहीतर मुंबई आणि NH 48 वर असलेल्या ठिकाणांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे.

 

भविष्यात गर्दी वाढू शकते
या मार्गावर अवजड वाहनांची ये – जा वाढण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यात गर्दी वाढू शकते. न्हावा शेवा मध्ये सध्याचे रस्ते अरुंद असून MTHL वरुन उतरणाऱ्या वाहनांना 1.5 कमीचा वळसा घालावा लागतो. ऐन गर्दीच्या वेळी यासाठी 45 मिनिटं लागतात. त्यामुळे होणारी कोंडीवर मात करण्यासाठी मुंबई ट्रान्स – हर्बर लिंकच्या 6 किमीच्या विस्ताराची योजना आखली आहे.

 

प्रकल्पासाठी 17 हजार 843 कोटींचा अंदाजित खर्च
या प्रकल्पासाठी 2 हजार 639 कोटी रुपयांच्या कर्जाच्या उभारणीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department) मान्यता दिली आहे.
हा लिंक रोड जवळपास 22 किमीचा असून 16.5 किमीचा मार्ग समुद्रातून आणि 5.5 किमीचा मार्ग जमिनीवरुन असणार आहे.
या प्रकल्पाची अंदाजित किंमत 17 हजार 843 कोटी रुपये आहे.
सरकारने एमटीएचएल प्रकल्पासाठी जायका या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून घ्यावयाच्या कर्जासाठी 15 हजार 100 कोटी रुपयांच्या मर्यादेत शासन हमी दिली आहे.

 

Web Title :- Mumbai-Pune Trans Harbor Link Road | travle mumbai to pune in 90 minutes by mumbai trans harbour link know all about the future route

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा