पुणे-मुंबईसह कोकणघाट, मध्य महाराष्ट्रातून पाऊस कधी घेणार सुट्टी ? हवामान खात्यानं सांगितला अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून पुणे, ठाणे, मुंबई, कोकणासह महाराष्ट्रात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. अनेक धरणे क्षमतेपेक्षा जास्त भरली असून नद्यांनादेखील पूर येत आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्ववत सुरळीत होण्यासाठी सगळेच काही काळासाठी पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत.

यातच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला असून किमान पुढील २४ तास तरी पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरचा पाऊस हळूहळू कमी होणार असल्याचे देखील वेधशाळेने सांगितले. सततच्या पावसामुळे वैतागलेल्या पुणे, ठाणे, मुंबई आणि कोकणातील लोकांना यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून त्याप्रमाणे आपले नियोजन नागरिक करू शकणार आहेत.

आपल्याकडे हवामान खात्याचे अंदाज चुकण्याचा पायंडा असला तरी यावेळी मात्र त्यांनी वर्तवलेले अंदाज अचूक ठरले आहेत. हवामान खात्याने मागे सांगितल्याप्रमाणे १० ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरु राहणार आहे मात्र घाटमाथ्यावरील त्याचा जोर मात्र नक्कीच ओसरणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पाऊस कमी झाल्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात मात्र मुसळधार पाऊस कोसळतच राहणार आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या शेतकरी राजाला दुष्काळामध्ये दिलासा मिळेल.

आरोग्यविषयक वृत्त