Mumbai Rains | चेंबूरमध्ये 5 घरावर दरड कोसळून 11 जणांचा तर विक्रोळीत 8 घरे कोसळून 3 जणांचा मृत्यु; एनडीएआरएफचे बचाव कार्य सुरु

मुंबई (Mumbai Rains) : पोलीसनामा ऑनलाइन –  Mumbai Rains |रात्रभर पडत असलेल्या पावसाने चेंबूर (Chembur) येथे ५ घरांवर दरड ( landslide) कोसळून त्यात ११ जणांचा मृत्यु झाला आहे. ही दुदैवी घटना मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास वाशीनाका (Washinaka) येथील न्यू भारतनगरमधील (New Bharat Nagar area) वांजरदांडा येथे घडला आहे. आतापर्यंत ढिगार्‍याखालून १६ जणांना बाहेर काढले असून आणखी ४ जण खाली अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईत कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाशीनाका येथील न्यू भारतनगर येथील डोंगराच्या कडेला ही वस्ती आहे. डोंगराच्या बाजूला संरक्षक भिंतही (wall collapse)  बांधण्यात आली होती. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोंगरावरुन माती खाली येऊ लागली. या मातीचा जोर वाढल्याने संरक्षक भिंत खाली असलेल्या ५ घरांवर कोसळली. त्यात या घरांमधील २० जण ढिगार्‍याखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, एनडीआरएफचे (NDRF) पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी बचाव कार्य सुरु केले आहे. आतापर्यंत १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यातील ११ जणांचा मृत्यु झाला आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

विक्रोळी (Vikhroli area ) येथील सूर्यानगर परिसरात दरड जवळपास ८ घरे कोसळली ( residential
building collapsed in Mumbai) आहे. या घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाला आहे. सूर्यानगर
येथील टेकडीच्या लगत ही वस्ती आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास टेकडीवरुन माती खाली येऊ लागल्यावर
तेथील लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी वरुन
दरड कोसळल्याने त्याखाली ७ ते ८ घरातील लोक दबले गेले. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

हे देखील वाचा

Birth of Twins | कशी जन्मतात जुळी मुले? जाणून घ्या गर्भात मेल-फिमेल बनण्याचे पूर्ण विज्ञान

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Rains | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur’s Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update