Mumbai Rains | मुंबईकरांसाठी काळरात्र ! पावसामुळे 25 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख तर मोदी सरकारकडून 2 लाखाची मदत जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत झालेल्या धुवांधार पावसामुळे (Mumbai Rains) तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे (Mumbai Rains) सकल भागात पाणी साचले, अनेक भागांत तर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते. अनेक घरात पाणी शिरलं होतं. अनेक मुंबईकरांसाठी शनिवारची रात्र ही काळरात्र ठरली. पावसामुळे घराचे छत कोसळून झालेल्या तीन घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये (Chembur) 17, विक्रोळीत (vikroli) 7 आणि भांडूपमध्ये (Bhandup) एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

NDRF, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु
घटनेची माहिती मिळताच NDRF आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरु आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी घटनेप्रति दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकी दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे.

चेंबूरमध्ये 17 जणांचा मृत्यू

चेंबूरमधील डोंगराच्या पायश्याशी वसलेल्या भारतनगरमध्ये भिंत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली अन् भिंत घरावर कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. चेंबुरच्या या भागात अरुंद गल्ली असून यामुळे बचाव करणे कठीण झाले. एवढेच नाही तर जागा काही उंचीवर देखील आहे. यामुळे एनडीआरएफ टीमला तिथ पोहोचणे अवघड झाले. सध्या मदत आणि बचावकार्य (Help and rescue) सुरु आहे. यासाठी स्थानिक लोकांची मदत घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. यामध्ये काही लहान मुलंही ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विक्रोळीत दुमजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू
विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत दुमजली इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का ? याचा शोध घेतला जात आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सोहम थोरात (Soham Thorat) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

राष्ट्रपतींकडून दु:ख व्यक्त
मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची बातमीनं दु:ख झालं. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

PM मोदी काय म्हणाले ?
या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो.

अमित शाह यांनीही दु:ख व्यक्त केलं

मुंबईत झालेल्या दुर्घटनेबाबत एकून स्तब्ध झालो आहे.
या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो.
ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

Web Titel :- Mumbai Rains | Black night for Mumbaikars! 25 killed in rains; The state government has announced Rs 5 lakh each for the relatives of the deceased and Rs 2 lakh each from the Modi government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

Pune Crime | 67 बँक अकाऊंट वापरत पुण्यातील महिलेला 4 कोटींचा गंडा; दिल्लीतून दोघांना अटक, 21 मोबाईल, हार्ड डिस्क, 5 नेट डोंगल, 3 पेन ड्राईव्ह, 4 लॅपटॉप, आणि 8 Sim Card जप्त