Mumbai Rains | मुंबईला जाताय तर अगोदर जाणून घ्या तेथील परिस्थिती; अतिवृष्टीमुळे पावसाने रेल्वेसह वाहतूक ठप्प

मुंबई (Mumbai Rains) : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Rains | शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने (Rain) संपूर्ण मुंबई (Mumbai) जलमय झाली असून रेल्वेसह रोड वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सीएसटीएम (CSTM) तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन (Mumbai Central Railway Station) सुटणाऱ्या अनेक एक्सप्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ कल्याण -मुंबई दरम्यानची लोकल सेवाही (Local Service) ठप्प झाली आहे. मुंबई व उपनगरात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली असून त्यामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. अनेक ठिकाणी घरात, दुकानात पाणी शिरले आहे.

वसई विरारमध्ये रात्रीच्या पावसाने संपूर्ण वसई -विरार जलमय झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने रेल्वे सेवा पूर्णत: बंद झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गुजरात तसेच उत्तरेकडून येणार्‍या १२ रेल्वेगाड्या या अंशत: रद्द केल्या असून वाटेतच थांबविण्यात आल्या आहे. तसेच लोकल गाड्याही थांबल्या आहेत.

प्रभादेवी – दादर (Prabhadevi – Dadar) दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चर्चगेटहून सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पहिली लोकल सुटली होती. तसेच बोरिवलीहूनही त्याचवेळी लोकल सोडण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सायन रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

मुंबई व उपनगरात अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूकीवर
मोठा परिणाम झाला आहे. सांताक्रूझ येथे 234 मिमी, कुलाबा येथे 196 मिमी, बांद्रा येथे २०२, मिरा रोड येथे
260, दहीसर येथे २४९, भायंदर 213, जुहू एअरपोर्ट 193 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही मुंबईत
जोरदार पाऊस सुरु आहे.

हे देखील वाचा

Labour Code News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! वाढलेल्या DA सोबत मिळू शकतात 300 सुट्ट्या !

DGP Sanjay Pandey | पोलिसांच्या संयमाचा गैरफायदा घेतल्यास दांडुका उगारावा लागेल’ – पोलीस महासंचालक संजय पांडेय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Rains | Heavy rains cause traffic jams in Mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update