मुंबईत मुसळधार पाऊस ! लोकल ठप्प, वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड, पाणी साचल्याने वाहतूककोंडी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून याचा फटका मुंबईला देखील बसला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली असून अनेक ठिकाणी वादळी वार्‍यामुळे झाडांची पडझड झाली आहे. तसेच रेल्वेसेवा देखील ठप्प झाली आहे. मागील 12 तासांत 150 मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय.

मुंबईसह उपनगरामध्ये कोसळणार्‍या पावसाचा अधिक वाढला आहे. दक्षिण मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. वादळी वारा आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळली आहेत. तर, पश्चिम द्रुतगती मार्गावरील मालाड इथे काल घडलेल्या दुर्घटनेमुळे वाहतुककोंडी झालीय. मरिन लाइन स्थानकाशेजारील झाड कोसळले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलसेवाही विस्कळीत झालीय.

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक भागांत झाडांची पडझड झाली असून यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या झाडांच्या पडझडीमुळे पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा, मरीन लाइन्ससह अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्यात. तर, मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमला देखील पावसाचा फटका बसला आहे. वादळी वार्‍यामुळे जसलोक रुग्णालयाच्या इमारतीचे पत्रेही उडून गेले. मुंबईमधील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झालाय. ताडदेव, स्लेटर रोड इथल्या डायना पुलाजवळ पाणी साचल्याने वाहने पाण्याखाली गेलीत.

मरीन लाइन स्थानकाजवळ रुळांजवळ झाड कोसळले. त्यामुळे ओएसमधील विद्युत पुरवठा बंद केले आहे. हे झाड हटवण्याचे काम सुरू असल्याने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान लोकल फेर्‍या बंद केल्या आहेत. वांद्र- अंधेरी येथून विरार-डडहाणू रोडसाठी लोकल फेर्‍या सुरु आहेत. तसेच मध्य आणि हार्बररेल्वेवरीलही लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. मस्जिद रेल्वेस्थानकामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते कुर्ला ते सीएसएमटी- वडाळादरम्यानची वाहतूक ठप्प झालीय. मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like