Mumbai Rains | गोंवडीत घर कोसळून 3 ठार तर 8 जण जखमी; शहरातील तिसरी घटना

मुंंबई (Mumbai ): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Mumbai Rains | गोवंडी भागातील शिवाजीनगर येथील घर कोसळून झालेल्या अपघातात एका ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकासह २ महिलेचा मृत्यु झाला आहे. (Mumbai Rains) घराची भिंत कोसळल्याने त्यात ८ जण जखमी झाले आहेत. नेहा परवेझ शेख (वय ३५), आणि मोकर जाबीर शेख (वय ८०),  शमशाद शेख (वय ४५) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.

गोवंडी भागातील बॉम्बे सिटी हॉस्पिटलजवळील एक मजली घर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कोसळले. त्याखाली १० जण दबले गेले होते. याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धावून गेले. त्यांनी घराचा मलबा बाजूला करुन सर्वांना राजावाडी हॉस्पिटल, सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातील तिघांचा मृत्यु झाला आहे.

परवेझ शेख (वय ५०), अमिनाबी शेख (वय ६०), अमोल धाडेई (वय ३८), समोल सिंग (वय २५), फैजेल कुरेशी (वय २१), नमरा कुरेशी (वय १७), शाहिना कुरेशी (वय २६) हे जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title: Maharashtra | Seven people injured, three died after a building collapsed in Govandi area of Mumbai. Details awaited: Mumbai Police

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !