मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे ‘हाय अलर्ट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने हाय अलर्टची घोषणा दिली आहे. चार दिवसाच्या या जोराच्या पावसामुळे बीएमसीची पोल उघड झाली. मुंबई संपूर्ण पणे जलमय झाले असून जिथे पाहावे तिथे पाणीच पाणी दिसत आहे. अशा परिस्थितीत, समुद्राच्या लाटा देखील उंच उंच उसळत असल्याने हवामान खात्याने हाय अलर्टची घोषणा दिली आहे.

मुंबई येथील सायन क्षेत्र, भक्ति पार्क क्षेत्र, पूर्वी फ्रीवे येथे मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली आहे. इतक्या जोरदार पावसामुळे मनुष्य जीवन विस्कळीत होण्याच्या स्थितीत आहे. तर या पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाले आहे. या वाहतूक कोंडीमुळे लोकांना वेळेवर ज्या ठिकाणी पोहचायचे आहे तिथे पोहचणे अवघड झाले आहे.

पालघर येथे पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने हेल्प डेस्क नंबर प्रसिद्ध केले आहे. हवामान खात्याच्यानुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथे सलग २ तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई मधल्या झालेल्या इतक्या जोरदार पावसामुळे दादरच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशा या पावसामुळे सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकासोबत अन्य रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वेच्या रुळा पाण्याखाली गेल्या आहेत. म्हणून काही गाड्या रद्दही करण्यात आल्या आहेत.