संजय निरुपम यांना RPI मध्ये येण्याचे रामदास आठवलेंकडून निमंत्रण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांना आपल्या पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे. तिकीटवाटपावरून संजय निरुपम काँग्रेसवर नाराज आहेत. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीची उमेदवार यादी जाहीर झाल्यापासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकाही समर्थकाला तिकीट न मिळाल्यामुळं निरुपम यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम पक्ष नेतृत्त्वावर नाराज असून आपण प्रचारात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस पक्षाला माझी गरज आहे असं वाटत नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली. रामदास आठवले म्हणाले की , ‘संजय निरुपम यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील व्हावे. भाजप आणि शिवसेनेत अगोदरच नेत्यांचा मेळावा आहे. संजय निरुपम आरपीआयमध्ये येण्यास इच्छूक असतील तर त्यांनी जरूर यावे. मी त्यांना पार्टीत येण्यासाठी आमंत्रित करतो त्यांचा आणि त्यांच्या अनुभवाचा इथे पूर्ण आदर केला जाईल.’

 

Visit : Policenama.com