लग्नामध्ये रणवीर सिंग दीपिकाची चप्पल हातात घेऊन फिरतोय : फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील जोडी नेहमीच चर्चेत असते. अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत असतात. आताही दोघांचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. रणवीर दीपिकाची चप्पल हातात घेऊन तिच्या मागे फिरताना दिसत आहे.

रणवीरचा चप्पल हातात घेतलेला फोटो सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. मुंबईतील एका लग्नातील हा फोटो असल्याचे दिसत आहे. दोघेही या फोटोत गडबडीत असल्याचं दिसत आहे. रणवीरचा फोटो नीट पाहिला तर रणवीरने दीपिकाचे हिल्स असणारे सँडल हातात धरलेले दिसत आहे. दुसरीकडे दीपिका लग्नातील मंडळींसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

रणवीरचा हातात दीपिकाची चप्पल घेतलेला फोटो नेटकऱ्यांना भलताच आवडलेला दिसत आहे. काहींनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी प्रतिरक्रिया देताना रणवीरला परफेक्ट नवरा असंही म्हटलं आहे. नेटकऱ्यांपैकी काहींनी रणवीरचे कौतुक केल्याचेही दिसत आहे. हा फोटो पाहणारा प्रत्येक जण हा फोटो पुढे शेअर करत आहे.

You might also like