क्राईम स्टोरीमुंबई

Mumbai Rape Case | बहिणीनं भावावर केला बलात्काराचा आरोप, न्यायालयासमोर आलं भयानक सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Mumbai Rape Case | आपल्या सख्ख्या भावाने (Brother) आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप बहिणीने (Sister) केला होता. यानंतर भावावर गुन्हा दाखल करुन त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. परंतु न्यायालयात (Court) सुनावणी दरम्यान या बलात्कार प्रकरणातील (Mumbai Rape Case) खरे सत्य समोर आले. त्यानंतर न्यायालयाने भावाची या प्रकरणातून (Mumbai Rape Case) निर्दोष सुटका केली. धक्कादायक म्हणजे, प्रियकराच्या सांगण्यावरुन बहिणीनं आपल्या भावावर बलात्काराचा आरोप (Rape Allegation) करुन भावाच्या अटकेचा कट रचल्याची कबुली तरुणीने दिली.

दोन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीने सख्ख्या भावावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
तिच्या आरोपाची दखल घेऊन पोलिसांनी तरुणाला पॉस्को अंतर्गंत अटक केली होती.
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु होती.
सुनावणीदरम्यान या तरुणीनं भावावर खोटा आरोप केल्याची कबुली दिली.
तरुणीच्या कबुलीनंतर तरुणाची न्यायालयाने निर्दोष सुटका केली.

अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते.
बहिणेचे प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती भावाला समजली होती.
त्याचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. अनेक वेळा सांगून देखील ती भावाचे ऐकत नव्हती.
भावाच्या रोजच्या ओरडण्याला ती वैतागून गेली होती.
अखेर तीने प्रियकराच्या सांगण्यावरुन भावाविरोधातच खोटी तक्रार पोलिसांकडे दिली.

 

2017 मध्ये केला होता बलात्काराचा आरोप

अल्पवयीन तरुणीने यापूर्वी 2017 मध्ये पहिल्यांदा बलात्कार झाल्याचे कोर्टात सांगितले होते.
त्यावेळी तरुणीची आई नाईट शिफ्टला गेली होती तर वडिल बाहेर कामासाठी गेले होते.
त्यानंतर 2018 मध्ये तरुणीने पुन्हा एकदा भावाने बलात्कार केल्याची माहिती आई-वडिलांना दिली होती,
असं तरुणीने पोलिसांना आणि कोर्टाला सांगितले.
त्यानंतर भावावर पॉक्सो अंतर्गत कारवाई (Pocso act) करुन त्याला अटक (Arrest) करण्यात आली होती.

भाऊ 2 वर्षापासून तुरुंगात

बहिणीने बलात्काराचा आरोप केल्याने भावाला अटक करण्यात आली होती.
त्यानंतर मागील दोन वर्षापासून तो तुरुंगात होता. अखेर मुलीने कोर्टात हा आरोप खोटा असल्याची कबुली दिली.
तसेच, भाऊ आपल्याला वाचवत होता, असंही कोर्टाला सांगितलं.
त्यानंतर न्यायालयाने हा खटला चुकीचा असल्याचे सांगत तरुणाची निर्दोष मुक्तता केली.

 

Web Title : Mumbai Rape Case | court orders to release brother whose sister accused him for rape

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | गरीबांसाठी खुशखबर ! मोदी सरकार देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, तात्काळ करा ‘हे’ काम; जाणून घ्या

Anti Corruption | 25 हजाराची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Court | मंगलदास बांदल यांचा जामीन फेटाळला

Back to top button