‘त्या’ सीपीएम नेत्याच्या मुलाकडून दुबईतील बारमध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – केरळमधील सीपीएम नेता कोडीयेरी बालकृष्णय यांच्या मुलाने दुबईतील डान्स बारमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ओशीवरा पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बिनॉय विनोदिनी बालकृष्णन असे सीपीएम नेत्याच्या मुलाचे नाव आहे. त्याच्याविरोधात भादंवि ३७६ आणि ४२० या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकार

बिनॉय आणि पिडीत महिलेची दुबईतील डान्स बारमध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर २०१० साली बिनॉय याने पिडीत महिलेला मुंबईत आणले. पश्चिम उपनगरामध्ये त्याने भाड्याने घर घेतले. त्याने महिलेला लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यांना यातून एक ८ वर्षांचा मुलगाही आहे. मात्र अलिकडच्या काळात तो महिलेला सोडून गेला. तो तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करू लागल्याने महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. ओशीवरा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सिनेजगत

Video : ‘दबंग’ सलमान खानचा ‘हा’ व्हिडीओ प्रचंड ‘व्हायरल’

सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाची तारीख पुन्हा ‘चेंज’, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

‘हा’ आहे जपानी सर्वात स्वस्त उपाय ज्याने तुम्ही ठेवू शकतात तुमचे वजन नियंत्रणात

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच