संतापजनक ! होय, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकावर महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये महिला अत्याचाराच्या एका मागोमाग एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. मुंबईमध्ये कास्टिंग दिग्दर्शकाकडून मॉडेल आणि चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच मुंबईच्या कुर्लामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर आणि मुंबईत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित महिला रात्री अकराच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पायी जात होती. सावळे नगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली असता आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे अधीपासूनच त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी पीडित महिलेस झाडीत ओढून घेऊन तिच्यावर जबरी संभोग करत असतानाच आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तेथून आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांनी हे पाहीले आणि त्यांनी पीडितेला मदत करण्याऐवजी तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.

आरोपींनी पीडित महिलेचे 28 हजार रुपये आणि मंगळसुत्र घेऊन पळू जात होते. रस्त्याने जाणाऱ्या महिलेने मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला असता पोलीस तात्काळ घटनास्थीळी दाखल झाले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने दोन आरोपींना अटक केली. तर उर्वरीत आरोपींना देखील पोलिसांनी काही वेळात अटक अटक केली. आरोपींविरुद्ध नेहरू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी महिलेची वैद्यकीय चाचणी केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कुर्ला परिसरातच राहणारे आहेत. त्यातील एकावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर एक आरोपी सेल्समन आणि एक रिक्षा चालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –