Mumbai Ratna Award | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा ‘मुंबई रत्न’ पुरस्काराने सन्मान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम (Special Public Prosecutor Adv. Ujjwal Nikam) यांना ‘मुंबई रत्न’ पुरस्कार (Mumbai Ratna Award) देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यभवन येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा ‘मुंबई रत्न’ पुरस्कार (Mumbai Ratna Award) देऊन सन्मान करण्यात आला.

फिल्म टुडे (Film Today), नाना-नानी फाउंडेशन (Nana-Nani Foundation) आणि एनार ग्रुपतर्फे (Enar Group) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्जवल निकम (Special Public Prosecutor Adv. Ujjwal Nikam) यांचा देखील सन्मान करण्यात आला. अ‍ॅड. उज्जवल निकम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार स्विकारला.

यावेळी अ‍ॅड. उज्जवल निकम, गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज (Godrej Group President Adi Godrej), मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल (bmc commissioner iqbal singh chahal), बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani), इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे अनंत गोयंका, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायम, अनूप जलोटा, युनियन बँकेचे चेअरमन राजकिरण रॉय, डॉ. शोभा घोष, आशिष चौहान यांचा ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

अ‍ॅड. उज्जवल निकम यांच्या विषयी थोडक्यात

अ‍ॅड. उज्जवल निकम हे विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) आहेत.
त्यांनी अनेक क्लिष्ट खून प्रकरणात आणि दहशतवाद प्रकरणांमध्ये सरकारची बाजू मांडून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
1993 चा बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन खून प्रकरण आणि 2008 चा मुंबई हल्ला या प्रकरणातील संशयितांवर खटला चालविण्यास आणि पिडीतांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी सरकारची मदत केली.
2013 मधील मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण,
2016 मधील कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
सरकारी वकील म्हणून यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
दहशतवादी अजमल कसाब विरुद्ध (Ajmal Kasab) खटल्यात सरकारी वकील म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
न्यायालयाने अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती.

Web Title :- Mumbai Ratna Award | Adv. Ujjwal Nikam honored with ‘Mumbai Ratna’ award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | मुंबईसह पुण्यातही अतिमुसळधार पावसाची शक्यता; आगामी 48 तासांसाठी कोकणात Red alert

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला