ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला याला NCB कडून अटक

मुंबई : एनसीबीने (NCB) ड्रग्ज प्रकरणात मुंबई शहरातील प्रसिद्ध मुच्छड पानवाला यास अटक केली आहे. त्याची ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. एनसीबी (NCB)  सतत छापेमारी करत आहे आणि मागील काही दिवसांत त्यांनी मोठ्या प्रमाणात चरस-गांजा जप्त केला आहे. मुच्छड पानवाला यास कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती अद्याप एनसीबीने दिलेले नाही.