50 लाख रूपये किंमतीचा ‘दुर्मिळ’ साप जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक ‘डिमांड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी मुंबईमधून रेड सॅण्ड बोआ या प्रजातीचा साप जप्त करण्यात आला असून या सापाची किंमत 50 लाख रुपये आहे. यासंदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यांअंतर्गत या सापाची तस्करी करण्यास बंदी आहे.

पोलीस सहाय्यक निरीक्षक नीलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईमधील पनवेल येथून या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून रेड सॅण्ड बोआ हा दुर्मिळ प्रजातीचा साप जप्त करण्यात आला आहे. जाधव नावाच्या 20 वर्षीय व्यक्तीला या प्रकरणी अटक केली असून वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे आणखी तपास सुरु असून तो हा साप कुणाला विकणार होता याची पोलीस चौकशी करत आहेत.

रेड सॅण्ड बोआ या सापाची वैशिष्ट्ये
या सापाचा वापर औषध, सौंदर्य प्रसाधने आणि जादूटोणा करण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाला मोठी किंमत असून या सापामध्ये विष आढळून येत नाही. याच्या डोक्याच्या आणि शेपटाचा आकार हा गोल असतो तर यामुळे त्याला दोन डोके असल्याचा भास निर्माण होतो. हा साप केवळ रात्री बाहेर निघतो, मात्र खूप जाड असल्याने तो हळूहळू सरपटतो. हा साप कधीही स्वतःचे घर बनवत नाही तर उंदराच्या बिळात घुसतो.

Visit : Policenama.com