Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार नाहीत, तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai School Reopen | कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील पहिलीपासून शाळा सुरू (Mumbai School Reopen) करण्याचा निर्णय घेतला. सर्व शाळा 1 डिसेंबर म्हणजे उद्यापासून सुरु होणार आहेत. मात्र, मुंबईतील शाळांबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) 1 तारखेपासून शाळा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईतील प्राथमिक शाळा 1 डिसेंबर नाही तर, आता 15 डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

 

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron variant) भारताला चिंता लागून आहे. यामुळे नागरीक धास्तावले आहे. जिल्हा प्रशासन देखील शाळा सुरु करण्याबाबत गोंधळात आहेत. त्याचबरोबर शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्यात देखील संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिकेची बैठक झाली आहे. यामध्ये पालिकेकडून (BMC) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 1 तारखेपासून सुरु होणारी शाळा आता थेट 15 डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. (Mumbai School Reopen)

 

दरम्यान, राज्य सरकारच्या (Maharashtra Government) शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) काल (सोमवारी) शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
त्यामुळे शाळा 1 डिसेंबरपासून सुरु होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
परंतु, मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्यासाठी 15 डिसेंबरही तारिख निश्चित केली आहे.
त्यामुळे उद्यापासून मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु होणार नसण्याला पुर्ण विराम मिळाला आहे.

 

Web Title :- Mumbai School Reopen | mumbai schools will not be started from 1st december bmc take big decision of BMC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Variant | पुणेकरांची चिंता वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीमध्ये ‘कोरोना’ची लक्षणं, रिपोर्टची प्रतीक्षा

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

Excise Duty On Petrol-Diesel | 1 लीटर पेट्रोल-डिझेलमधून किती कमाई करते सरकार? संसदेत मोदी सरकारने दिले उत्तर