मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आज मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.त्याचबरोबर मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सलग तिसऱ्या दिवशीही पावसानं मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे.सध्या मुंबई उपनगरांसोबत ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. रविवारी दिवसभर मुंबईत जोरदार पाऊस झाला.

[amazon_link asins=’B07111KBYN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ebc4e90f-8351-11e8-ad45-23d58e7a33ec’]

मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल खोळंबल्या आहेत. संथ गतीने महामार्गावरील वाहतूक सुरु आहे. सांताक्रुझ वेध शाळेमध्ये 137 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे परिसरातील सहयाद्री शाळेत नाल्याचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे शाळेचा परिसर जलमय झाला आहे. पावसाची स्थिती पाहता, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.