Mumbai Sessions Court | एक व्यक्ती आपल्या नियोजित वधूला अश्लील मेसेज का पाठवतो? जाणून घ्या मुंबईच्या सेशन कोर्टात काय म्हटले गेले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Sessions Court | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) काही दिवसांपूर्वीच मुंबई हायकोर्टाचा (Bombay High Court) एक निर्णय रद्द केला. हायकोर्टच्या जजने म्हटले होते की, कुणासोबत छेडछाड तेव्हाच मानली जाईल, जेव्हा स्किन टू स्किन टच (Skin To Skin Touch) होईल. सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलताना म्हटले की, छेडछाडसाठी (Molestation Case) स्किन टू स्किन टच होणे आवश्यक नाही. (Mumbai Sessions Court)

 

आता मुंबईच्या कोर्टाचा असाच एक निर्णय सध्या चर्चेत आहे. कोर्टाने म्हटले की, विवाहापूर्वी नियोजित वधूला अश्लील मेसेज पाठवणे प्रतिष्ठेचा अवमान नाही. हे एकमेकांच्या भावना समजणे आणि आनंदासाठी मानले जाऊ शकते.

 

काय आहे पूर्ण प्रकरण?

ही गोष्ट 11 वर्षापूर्वीची आहे. एका मुलीने आपल्या 36 वर्षाच्या वागदत्त वरावर लग्नाचे अमिष दाखवून बलात्काराचा आरोप केला होता. दोघांची 2007 मध्ये मेट्रोमोनियल साईटवर भेट झाली होती. मुलाची आई विवाहाच्या विरूद्ध होती. या कारणामुळे 2010 मध्ये मुलाने मुलीसोबतचे नाते संपवले. कोर्टाने म्हटले की, विवाहाचे आश्वासन देऊन नंतर नकार देण्यास, फसवणे किंवा बलात्कार (Rape) म्हणता येणार नाही.

 

कोर्टाने (Mumbai Sessions Court) सांगितले की, कपल विवाहासाठी आर्य समाज हॉलमध्ये सुद्धा गेले.
परंतु, विवाहानंतर राहण्याच्या मुद्द्यावरून भांडण झाले आणि शेवटी मुलाने आपल्या आईचे ऐकून विवाहाला नकार दिला.

 

कोर्टाने म्हटले की, हे विवाहाच्या खोट्या आश्वासनाचे प्रकरण नाही. हे योग्य प्रयत्नात अपयशी ठरल्याचे प्रकरण आहे.
विवाहापूर्वी नियोजित वधूला किंवा वराला अश्लील मेसेज पाठवणे दोघांमध्ये आपली इच्छा व्यक्त करणे होऊ शकते.
सेक्सची भावना जागृत करणे असू शकते. असेही होऊ शकते की, अशा मेसेजमुळे मुलीला सुद्धा आनंद होईल.
मेसेजला नियोजित वधूच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्यासोबत जोडता येऊ शकत नाही.

 

Web Title :- Mumbai Sessions Court | mumbai sessions court said sending dirty message is not an insult to fiancee marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sania Mirza-Peng Shuai | सानिया मिर्झाची ‘डबल्स’ची पार्टनर बेपत्ता, माजी उप पंतप्रधानांवर केला होता लैंगिंक छळाचा आरोप

Multibagger Penny Stock | 36 पैशांचा शेयर झाला 94 रुपयांचा, 1 लाख झाले 2.50 कोटींपेक्षा जास्त; तुमच्याकडे आहे का?

Meghraj Rajebhosle | मेघराज राजेभोसले यांची ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड