बॅंक घोटाळा : अजित पवारांसह इतर 48 नेत्यांना ‘सुप्रीम’ झटका, गुन्हा नोंदवून कारवाईचा उच्च न्यायालयाचा आदेश योग्यच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसाभा निवडणुकीच्या आगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून दिलेला कारवाईचा आदेश योग्यच असल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयालयाने नकार दिला आहे. तसेच तातडीनं सुनावणी घेण्यासाठीची याचिका देखील फेटाळून लावत महाराष्ट्र पोलिसांना योग्य तपास करण्यास सांगितले आहे.

बँकेतील कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने 22 ऑगस्ट रोजी दिले होते. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सहा विशेष याचिका सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा व न्यायमूर्ती एम.आर. शहा यांनी आज (सोमवार) फेटाळल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 50 नेते अडचणीत सापडले आहेत.

मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला वसंतराव शिंदे, अमरसिंह पंडित, सिद्रामाप्पा आलुरे, आनंदराव अडसूळ, निलेश सरनाईक, रामप्रसाद बोर्डीकर यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या मतांचा परिणाम होऊ न देता तपास पूर्ण करावा अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त