आजोबाने केले नातीचे लैंगिक शोषण 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेली एक ९ वर्षांची चिमुकली ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील एका रुग्णालयात आली होती. तिला सोबत म्हणून आलेल्या आजोबाने ती एकटी असताना अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून नातीचा विनयभंग करणाऱ्या आजोबाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8bb38aaa-c258-11e8-917b-17e098f7e817′]

दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर  ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबाला अटक केली आहे. शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होती. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या लहान मुलीच्या आईचं निधन झालं असून ती अनाथआश्रमात राहत होती.

व्यापाऱ्याकडे खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद