खळबळजनक ! ‘मर्डर’च्या 6 महिन्यानंतर देखील शीना बोरा जिवंत होती, इंद्राणी मुखर्जीचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शीना बोरा हत्याकांड घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली होती. पण आता या घटनेतील आरोपी इंद्राणी मुखर्जी ने विशेष सीबीआय कोर्टात केलेल्या दाव्यामुळे या केसमध्ये नवीनच संभ्रम निर्माण झाला आहे. शीना बोरा ही खून झाल्यानंतरही ६ महिने जिवंत होती आणि ती आपल्या पतीसोबत होती असा दावा इंद्राणीने केला आहे.

इंद्राणीने या घटनेत ५ व्यांदा आपल्या जामिनासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तिची सुनावणी सुरु असताना तिने हा खळबळजनक दावा केला आणि यासाठी तिने राहुलच्या कॉल रेकॉर्ड चा आधार घेतला. राहुल आणि शीना यांच्यात २६, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मेसेजद्वारे संभाषणही झाले होते, असं तिनं कोर्टात सांगितलं. मला या घटनेत जाणूनबुजून अडकवले जात आहे, मी निर्दोष आहे असे म्हणणे तिने कोर्टासमोर मांडले. मला २००५ मध्ये अटक झाल्यावर पीटर मुखर्जी ने माझ्या आणि त्याच्या मुलांच्या खात्यात ६ कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. मला अटक होण्यापूर्वी मी अनेक वेळा भारतात आणि भारताच्या बाहेर प्रवास केला आहे. जर मी गुन्हेगार असते तर, भारतात परतले असते का ? असेही इंद्राणी यावेळी म्हणाली. यामधील आणखी आरोपी पीटर मुखर्जी ला कोर्टाने ६ फेब्रुवारी रोजी जमीन मंजूर केला आहे.