शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे ‘वक्तव्य’, आता राष्ट्रवादीला दिली ‘ही’ ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत ऑफर देण्यात आल्याचे समजते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिवसेना पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर अडून बसली असल्याचे समजते.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब देखील करण्यात आले होते. पण याच गोष्टीवरून अजित पवार नाराज झाले होते आणि त्यांनी बैठक अर्धवट सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार यांनी त्यानंतर भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद आता कोर्टात पोहोचलाय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर रविवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.तीनही पक्षांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली होती त्यावर आज साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याची बाजू मांडतांना कपिल सिब्बल यांनी फडणवीस सरकारवर अनेक सवाल उपस्थित केले. जर राज्यात भाजपकडं बहुमत आहे तर त्यांनी ते आजचं सिद्ध करावं. तसेच मध्यरात्री अचानक राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्याचा मुद्दाही सिब्बल यांनी उपस्थित केला.अजित पवार हे आता गटनेते राहिलेले नाहीत असे संघवी यांनी सांगितले होते. त्यावर तीन आठवडे विरोधक कुठे होते ? आज अचानक ते केस घेऊन आलेत असा प्रतिवाद मुकुल रोहतगी यांनी केला. आज होणाऱ्या सुनवाईकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com