राज्यातील 288 जागांचं वाटप म्हणजे भारत-पाकिस्तानच्या ‘वाटणी’पेक्षा देखील भयंकर : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या असल्या तरी शिवसेना – भाजप युतीच्या जागा वाटपावर निश्चिती झाली नाही. अशातच शिवसेनेच्या नेत्यांकडून अनेक विधाने येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की महाराष्ट्र इतका मोठा आहे. हे 288 जागांचे वाटप हे भारत पाकिस्तानच्या वाटणीपेक्षा भयंकर आहे. आम्ही जर सरकारमध्ये न राहता विरोधी पक्षाच्या जागी असतो तर आज परिस्थिती अत्यंत वेगळी असती. जागा वाटपाबाबत जो काही निर्णय होईल तो आम्ही तुम्हाला लवकरच सांगू.

राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या तारखांच्या घोषणा झाल्या आहेत. राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला निवडणूका होतील. परंतू निवडणूकआधी भाजप शिवसेनेचा अजून ही जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. दोन्ही पक्षात जागा किती द्याच्या यावर सहमती झालेली नाही. तर इकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे. जागा वाटप देखील लवकर पूर्ण होईल.

भाजप शिवसेनाची युती 120 – 130 जागांवरुन अडून राहिली आहे. शिवसेना कमी जागांवर निवडणूका लढण्यास तयार नाही. त्यामुळे युतीवर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. दुसरीकडे भाजप शिवसेना लवकरच यावर पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हणले जात आहे.

फॉर्म्युला निश्चित, लवकरच निर्णय –
जागा वाटपावरुन संजय राऊत म्हणाले की, दोन्ही पक्षांचे एका फॉर्म्युलावर काम सुरु होते ते जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे येणारे 24 तास महत्वपूर्ण असणार आहेत. ते म्हणाले की, जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा शेवटचा टप्पा असेल. शिवसेनेने दिलेला शब्द, आश्वासन सेना नक्की पाळेल.

Visit: Policenama.com