बंगालमध्ये शिवसेना निवडणूक लढवणार नाही; ममतांना ‘शेरनी’ म्हणून दिला पाठिंबा – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  पश्चिम बंगालची निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचे नेता संजय राऊत यांनी ट्विट करून सांगितले, पार्टीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘बंगालची शेरनी’ असे म्हणत लिहले की, शिवसेना एकजुटीने त्यांच्या सोबत आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विटमध्ये लिहले की, शिवसेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिस्थिती पाहता हे स्पष्ट झाले आहे की, पश्चिम बंगालमध्ये दीदींच्या विरोधात सर्वांची लढाई आहे. सर्व विरोधी पार्टी, मनी, शक्ती आणि मीडिया यांचा वापरममता दीदींच्या विरोधात वापरात आहेत. हे पाहता शिवसेनेने निर्णय घेतला आहे की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार नाही.

बंगालची शेरनी

शिवसेनेचे नेता संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तारीफ करत असे लिहले की, आम्हाला विश्वास आहे की खऱ्या अर्थाने त्या बंगल्याच्या शेरनी आहेत. शिवसेना या लढाईत ममता दीदींच्या सोबत आहेत. आम्ही त्यांच्या यशाची आशा करतो.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये होणार निवडणूक

महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने गेल्या शुक्रवारी (२७फेब्रुवारी) ला विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. निवडणूक आयोगानुसार २७ मार्चपासून मतदानाला सुरवात होणार आहे. २९ एप्रिलपर्यंत निवडणूक चालेल. तर मतमोजणी २ मे ला होईल. त्यानंतर आठ टप्प्यांमध्ये निवडणूक संपन्न होईल. आयोगानुसार वोटिंग २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिलला होईल.