शिवसेनेचा एकला चलो रे नंतर, पुन्हा भाजप सोबत हम साथ-साथ है!

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन
शिवसेनेने राज्यातील कोणत्याही निवडणूकात यापुढे मित्रपक्ष भाजप सोबत युती न करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर शिवसेनेने विधानपरिषदेच्या काही जागावर उमेदवारांची नावे देखील जाहीर केली होती. मात्र आता आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सेना-भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, या दोन्ही पक्षानी पुन्हा एकदा निवडणूकात हम साथ- साथ है चा नारा दिला आहे. तर गोंदिया- भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 चा फॉर्म्युला निश्चित झाला असून, तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर तीन जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे. तर कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.