Mumbai : मार्चपासून ऑनलाइन नोंदणीद्वारेच होईल सिद्धिविनायकाचे दर्शन, एका तासात 100 गणेश भक्तांना मिळेल Entry

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ पहाता आता मुंबई येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांना अगोदर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधीत एका पदाधिकार्‍याने ही माहिती दिली आहे की, ही व्यवस्था एक मार्चपासून लागू होईल.

त्यांनी सांगितले की, पुढील महिन्यापासून ऑनलाइन नोंदणी करणार्‍यांनाच दर्शनाची परवानगी दिली जाईल आणि एक तासात मंदिराच्या आत 100 भाविकांना जाण्याची परवानगी असेल.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले यांनी सांगितले की, सध्या दर्शनासाठी नोंदणी न करणार्‍या भाविकांना या ठिकाणी क्यूआर कोड दिले जातात ज्याद्वारे ते मंदिरात प्रवेश करतात.

त्यांनी म्हटले की, परंतु आम्ही एक मार्चपासून ही व्यवस्था रोखण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत नोंदणी न करणार्‍या भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

त्यांनी म्हटले, प्रत्येक तासाला केवळ शंभर भाविकांनाच अगोदरच बुक केलेल्या क्यूआर कोडसह सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी जाण्याची परवानगी असेल. छापवाले यांनी म्हटले की, अंगारकी चतुर्थी (दोन मार्च) च्या दिवशी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान दर्शनाची परवानगी असेल.