Mumbai Silver Oak Agitation | सिल्व्हर ओक आंदोलनात अटक झालेल्या ‘त्या’ महिला वाहकाचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mumbai Silver Oak Agitation | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्यांना पोलिसांनी अटक (Arrested) केली. दरम्यान, या मोर्चात कराड आगारातील महिला वाहक सुषमा नारकर (Sushma Narkar) यांना अटक (Arrested) करण्यात आली होती. आठ दिवस त्या तुरुंगात होत्या. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र, तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी त्यांच निधन (Conductor Sushma Narkar Dies) झालं. (Mumbai Silver Oak Agitation)

 

सुषमा नारकर यांनी परिवहन महामंडळाच्या कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याचा मान मिळवला होता. 2000 मध्ये त्या कराड एसटी आगारात वाहक म्हणून दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे 22 वर्षे त्यांनी वाहक म्हणून एसटीमध्ये सेवा दिली होती. गतवर्षी परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. त्यामध्ये सुषमा नारकर यांनीही सहभाग घेतला होता.

 

दरम्यान, काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी मोर्चा काढला होता.
त्यामध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. मोर्चाला हिंसक वळण लागल्यावर अनेक एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
त्यामध्ये सुषमा नारकर यांचाही समावेश होता.

 

Web Title :- Mumbai Silver Oak Agitation | woman st conductor sushma narkar dies she arrested for participating in silver oak agitation mumbai

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime |  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घराबाहेरील झाडाच्या फांद्या तोडणे पडले महागात, दोघांविरुद्ध FIR

 

Vishwajeet Kadam | ‘बरं झालं, संजय राऊत यांच्या अंगात आलं, अन् महाविकास आघाडीचं सरकार आलं’ – विश्वजीत कदम

 

BJP Leader On Thackeray Government | ‘अनेक आमदार मुख्यमंत्री ठाकरेंवर नाराज; 20 जूनला दिसेल देवेंद्र फडणवीसांचा चमत्कार’; भाजप नेत्याचा दावा