राज्यात MBBSच्या ३६७० जागा वाढणार ; पुणे, मिरज येथे विशेष ‘पॅरामेडिकल’ सेंटरला मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात एमबीबीएसच्या ३६७० जागा वाढवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मंजुरी दिली असून सात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांनाही परवानगी मिळाली आहे. तसेच पुणे आणि मिरज येथे विशेष पॅरामेडिकल सेंटर उभारण्यास राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. हर्ष वर्धन यांची शनिवारी दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागासाठी काही प्रस्ताव मांडले. या प्रस्तावावर महाराष्ट्रात एमबीबीएसच्या ३६७० जागा वाढवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मंजुरी दिली. यात नव्याने लागू होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्युएस) विद्यार्थ्यांसाठी २०२० आणि सामाजिक आणि आर्थिक
मागासवर्गीय समाजासाठी (एसईबीसी) १६५० जागा वाढवण्यात येतील. त्याचबरोबर सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक, बुलडाणा इथे सात नवीन शासकीय वैद्यकीय कॉलेजे सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. त्यालाही केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे वाहतूक शाखेतील ‘ढेरपोटे’ पोलिसांना ड्यूटी नाही ; उपायुक्तांचा आदेश

पुण्यात मध्यरात्री भारताचा विजय साजरा करणाऱ्या ‘क्रिकेटप्रेमीं’वर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’

क्रूर घटना : चिमुरड्याला ‘विवस्त्र’ करुन बसविले तापलेल्या फरशीवर ; पार्श्वभाग भाजला