आई वकील – वडील डॉक्टर, मुलगा 4 वर्षात 2 वेळा बनला CA टॉपर, ‘जाणून घ्या’ कशी केली तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धवलने पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. या आधी 2015 मध्ये सीएने आयपीसीसी इंटरमिजिएट परीक्षेमध्ये आठवा क्रमांक मिळविला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये CA च्या अंतिम परीक्षेत धवलला 800 पैकी 531 गुण मिळाले होते. त्याची आई वकील तर वडील डॉक्टर आहेत.

आयसीएआय सीए परीक्षेत मुंबईचा विद्यार्थी धवल कपूरचंद चोप्राने देशामध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. सीए अंतिम परीक्षेत तो मुंबईचा पहिला टॉपर ठरला आहे. जाणून घ्या धवलने कशी प्रकारे केली याची तयारी.

आपल्या अभ्यासाबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धवल म्हणतो, आपल्या एका मित्रासोबत चार ते पाच महिने तयारी केली होती. यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढला. तसेच रोज कमीतकमी दहा तास अभ्यास करत असल्याचे देखील धवलने सांगिले.

भविष्यामध्ये तो स्वतःची लॉ फर्म सुरु करण्याचा विचार करत आहे. त्याचे म्हणणे आहे की,लॉ च्या विद्यार्थ्यांना टॅक्ससेशन सारख्या इतर व्यवसायिक न्यान दिले जात नाही. माझ्या साठी सीए म्हणजे केवळ एखाद्या कोड्याचे हरवलेले उत्तर याप्रमाणेच आहे.

महाराष्ट्रातून सीएच्या परीक्षेत देशामध्ये अव्वल स्थान पटकवणारा धवल हा एकमेव विद्यार्थी आहे. तर ICAI CA परीक्षेमध्ये ऑल इंडिया टॉपर कोलकत्त्याचा अभय बाजोरिया आहे. अभयने सांगितले की, त्याच्या वडिलांना सीए व्हायचे होते मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना सीए होता आले नाही. त्यामुळे मुलाने आपली ही इच्छा पूर्ण करावी असे त्यांचे मत होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like