मुंबईच्या ‘या’ 17 वर्षाच्या फलंदाजानं केलं व्दिशतक,18 वर्षानंतर झाला ‘विक्रम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचा युवा  याने आज झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमधील झारखंडविरुद्ध झालेल्या सामन्यात द्विशतक झळकावून विक्रम प्रस्थापित केला. त्याने आज झालेल्या सामन्यात 154 चेंडूंवर 203 धावांची खेळी करून नवीन विक्रम केले.

यशस्वी जासवाल याचे पराक्रम
जयस्वाल हा लिस्ट ए सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याने 17 वर्ष 292 दिवसांत हा कारनामा केला असून 21 व्या शतकात जन्माला येऊन हा कारनामा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. या सामन्यात त्याने 154 चेंडूच्या साहाय्याने 203 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 17 चौकार नि 12 षटकारांचा समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा यशस्वी हा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी या मोसमात केरळच्या संजू सॅमसन याने देखील गोव्याविरुद्ध नाबाद 212 धावांची खेळी केली होती. तर 2008 मध्ये उत्तराखंडच्या कर्णवीर कौशल याने देखील 202 धावांची खेळी केली होती.

विजय हजारे ट्रॉफी सर्वाधिक धावा
1. संजू सॅमसन (केरळ ) : 212 धावा , विरुद्ध गोवा (2019)
2. यशस्वी जयस्वाल (मुंबई) : 203 धावा , विरुद्ध झारखंड (2019)
3. कर्णवीर कौशल (उत्तराखंड) 202 धावा , विरुद्ध सिक्किम (2018)

या खेळीबरोबरच लिस्ट ए सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा तो नववा भारतीय फलंदाज ठरला असून यामध्ये पाच शतके हि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावली आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा कारनामा केला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी