‘या’ मंडळाच्या इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची किंमत ऐकून तुम्ही ‘व्हाल’ हैराण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बुद्धीची देवता अर्थातच गणपती बाप्पा. जसं जसं गणेश चतुर्थी जवळ येत आहे. तसं बापाच्या आगमनाची गणेश भक्तांना चाहूल लागली आहे. सध्या मुंबईतील चित्र शाळांमध्ये वेगवेगळ्या गणेश मूर्ती निर्माण करणे सुरु आहे. काही मंडळाचे मंडप सुद्धा तयार झाले असून त्यांनी गणेश मूर्ती सजावट मंडपामध्ये नेल्या आहेत. परंतु या सर्वामध्ये लालबाग येथील तेजुकाया मंडळाने निर्माण केलेली भव्य इकोफ्रेंडली गणेशमूर्ती लोकांच्या चर्चेचा विषय ठरू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. हि मूर्ती जुन्या वर्तमानपत्रांच्या कागदाचा लगदा वापरून तयार केली आहे.

आजकाल सगळीकडे पर्यावरणाबाबत जनजागरण सुरू असल्याचे दिसते. त्यातल्या त्यात जलप्रदूषण होऊ नये म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीं निर्माण करून जनजागरण केले जात आहे. तसं इकोफ्रेंडली गणेशमूर्ती जास्त उंच निर्माण करता येत नाहीत. त्यामुळे मोठी गणेश मंडळे याकडे दुर्लक्ष्य करताना दिसतात. परंतु, तेजुकाया मंडळाच्या मूर्तींमुळे लोकांसमोर एक नवा आदर्श निर्माण होणार आहे.

इकोफ्रेंडली गणेशमूर्ती २२ फुटांची

मंडळाने तयार केलेली हि मूर्ती तब्बल २२ फुटांची आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मागच्या वर्षापासूनच जुनी कागदपत्रे जमवण्यास सुरुवात केली होती. त्यातूनच हि मूर्ती साकार झाली आहे. हि मूर्ती आता लवकरच पूर्ण होऊ शकेल एवढे काम झाले आहे. त्यामुळे हि मूर्ती पाहण्याचे सर्वांना वेध लागले आहेत.

यात विशेष म्हणजे, १५ वर्षांपूर्वीही तेजुकाया मंडळासाठी अशीच मूर्ती तयार करण्यात आली होती. या वर्षी इकोफ्रेंडली मूर्ती बनवण्याच्या मंडळाच्या निर्णयामुळे मूर्ती तयार करण्याचे बजेट मात्र वाढले आहे. हि मूर्ती तयार करण्यासाठी मांडला तब्बल १२ लाख रुपये खर्चावे लागले आहेत.

मंडळाने जपले सामाजिक भान

अनेक गणेश मंडळे आपल्या देखाव्यामधून समाजप्रबोधन होऊ शकेल आणि सामाजिक भान जपले जाईल असे देखावे तथा उपक्रम सादर करतात. यंदा तेजुकाया मंडळाने सुद्धा आपल्या प्रवेशद्वारावर प्रति वर्षांप्रमाणें कसलीही सजावट न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी हे पैसे कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येतील असा निर्णय घेतला आहे. तसेच भाविकांनी गणपतीच्या दर्शनाला येताना प्रसाद किंवा फुलांऐवजी पेन्सिल आणि वह्या आणाव्यात असे सुचवले आहे. जमा झालेली रक्कम पुराचा जबरदस्त फटका बसलेल्या कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. असं लालबाग मधील तेजुकाया मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like