भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राजकीय ‘विजनवासात’ गेलेल्या ‘या’ माजी मंत्र्याच्या नावाची जोरदार चर्चा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर भाजपने आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या दिवाळीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्याजागी प्रदेशाध्यक्षपदी कुणाला संधी मिळते याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

पंकजा मुंढे, चंद्रकांत पाटील, त्याचबरोबर राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. त्यात आता एका नवीन नावाची भर पडली आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव देखील या शर्यतीत सामील झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय विजनवासात पाठवण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचे या निमित्ताने पुनर्वसन होणार की चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात हे पद टाकले जाणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे.

चंद्रकांत पाटील यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे, मात्र स्वतः चंद्रकांत पाटील यासाठी उत्सुक नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले एकनाथ खडसे यांचे यानिमित्ताने पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे भाजप नक्की कुणाला या पदावर निवडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

Loading...
You might also like