विध्यार्थ्यांच्या न्यायासाठी लोकपाल नियुक्त करणार : विनोद तावडे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असतांना विध्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विध्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ स्तरावर लोकपाल नियुक्त करण्यात येत असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.

राज्य सरकार विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पद्धतीवर भर देत आहे. त्या दृष्टीने विद्यापीठ कायद्यात अनेक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असतांना विध्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विध्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी, प्रवेश पद्धती, अवाजवी शुल्क तसेच महाविद्यालय किंवा संस्थेतील शैक्षणिक सुविधांचा अभाव या संदर्भात तक्रार करता यावी यासाठी महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन आणि शैक्षणिक संस्थामध्ये आणि विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना या केंद्रांमधून तक्रारींचे निरसन न झाल्यास लोकपालांकडे दाद मागता येणार आहे. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्र हे अशा प्रकारचे लोकपाल नेमणारे पहिलेच राज्य आहे. असा दावाही तावडे यांनी केला आहे. याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मनमानीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी म्हंटले.