राष्ट्रवादीचे बेरोजगारीच्या विरोधात अनोखे आंदोलन 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन  पंतप्रधान नरेंद्र मोदींना बेरोजगारीच्या मुद्द्यावरून जागे करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना शेकडो तरुणांनी आज ठाण्यातील दमाणी इस्टेट पोस्ट ऑफिस कार्यालयात आपला बायोडेटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षात नोकरीसाठी एकही कॉल आला नाही असं या तरुणांचं म्हणणं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षी दोन कोटी बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र रोजगार देणे बाजूलाच राहिले. आतापर्यंत ६.६० कोटी तरुण बेरोजगार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर बेरोजगारीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

दरम्यान या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्य म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शिवाय, यावेळी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीकाही केल्याचे दिसून आले. तरुणांना रोजगार मिळाला नाही तर देशात उद्रेक होईल आणि याला मोदी जबाबदार असतील असे आव्हाड यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us