आयआयटीत २५ मुलींना विषबाधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील महत्वाची शिक्षणसंस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील हॉस्टेलमध्ये २५ विद्यार्थींनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलींना होस्टेलच्या गोड पदार्थांतून विषबाधा झाली आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र आयआयटी हॉस्पिटलकडून आधी हा दावा खोडून काढण्यात आला होता. पण विषबाधेचे प्रकरण समोर आले आहे.

आयआयटी मुंबईकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एच १० या मुलींच्या हॉस्टेलमधील २५ मुलींना विषबाधा झाल्याचे कळले. जेवणात बनवलेल्या गोड पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. शिवाय, इथली मेस स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात आली असून पालिकेकडून ही मेसची तपासणी केली गेली. त्यासोबतच अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठण्यात आले आहेत. विषबाधेचे कारण अहवालानंतर कळेल असेही आयआयटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आयआयटी मुंबई ही जगातील प्रमुख संस्था असून मुंबई आयआयटी या संस्थेत भारताच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. विषबाधेच्या प्रकरणामुळे पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

ह्याहि बातम्या वाचा

?मोदींच्या बाल्लेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस आखणार आज रणनीती

?’दाल में कुछ काला है!, राफेलीची किंमत वाढली कशी ?’

?राजकीय भूकंप : विखे-पाटील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणार ?

?प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा

?अशी वक्तव्य करत राहिलात तर हवा भरण्याच्या आतच फुटाल…