नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलात कार्य़रत असणाऱ्या एका 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

रामेश्वर हंकारे (वय-29) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हंकारे यांनी विक्रोळीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून त्यांनी ती ताब्यात घेतली असल्याचे समजतेय.

विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगर ग्रुप नंबर 3 मध्ये राहात असलेल्या हंकारे हे सशस्त्र पोलीस दलात नेमणुकीस होते. सध्या ते मुख्य नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. सोमवारी रात्री त्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या विक्रोळी पोलिसांनी हंकारे यांचा मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला आहे.

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like