समविचारी पक्षांना सोबत घेण्यास तयार पण ‘वंचित’ची मानसिकता दिसत नाही : अजित पवार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र आघाडीसोबत येण्याची वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची मानसिकता दिसत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते तसेच येत्या ३० जूनपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची नावे निश्चित केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापण दिनानिमित्त पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येत्या विधानसभेला तरुणांना संधी द्यावी, शहरांकडे लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या होत्या. यावर बोलताना अजित पवार म्हणाले कि लोकसभेत झालेल्या चुकांवर चर्चा करण्यात आता अर्थ नाही. आगामी काळात आमचे लक्ष विधानसभेकडे असून शहरी भागात पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, नव्या चेहऱ्यांना या वेळी मोठ्या प्रमाणावर संधी देणार आहोत.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का ?
समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जी विधाने करत आहेत ते पहाता आमच्यासोबत येण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यांच्यामुळे आमच्या लोकसभेत ८ ते १० जागा पडल्या. तसेच वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम म्हणून काम करत होती हे आम्ही सतत सांगत होतो. जनतेला कळून चुकले आहे.

येत्या १३ ते १५ व २१ आणि २३ जून असे पाच दिवस सर्व जिल्ह्यांतील नेते, इच्छुक उमेदवारांच्या प्रदेश कार्यालयात बैठका होतील. ३० जूनपर्यंत आम्ही आमचे काम पूर्ण करू. काँग्रेसही या कामात गती घेईल, असे अजित पवार यांनी सांगितले.