पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण, १५ मिनिट चालला ‘थरार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वाहतूक पोलिसांचेच अपहरण झाल्याचा प्रकार चेंबूरमध्ये छेडा नगर येथे घडला. दारुच्या नशेत भररस्त्यात कार थांबवून बाहतूकीला अडथळा आणणाऱ्या ३ तरुणांना वाहतूक पोलिसांनी हटकल्यामुळे या वाहतूक पोलिसांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर १५ मिनिट पाठलाग केल्यानंतर जुन्या द्रुतगती मार्गावर अडवून पोलिसांकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले.

छेडा नगर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांना अडवल्यामुळे रागाच्या भरातून तीन तरुणांनी अपहरण केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. हे तीनही तरुण दारुच्या नशेत होते. यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. वाहतूक पोलीस विकास मुंडे यांचे याकडे लक्ष गेले. ते कार जवळ गेले आणि कार रस्त्याच्या कडेला घेण्यास संगितले. परंतू पळून जाऊ नये म्हणून ते देखील कार मध्ये बसले. परंतू मुंडे कारमध्ये बसल्यावर मुंडेंनाच घेऊन कार पळूवली. त्यानंतर पोलीस सहकारी आणि सहाय्यक आयुक्त वेंकट पाटील यांच्या पथकाने कारचा पाठलागा केला आणि जुन्या द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे कार अडवून त्यातील दोन तरुणांना ताब्यात घेतले. यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला.

या तीनही तरुणांची ओळख पटली आहे. यात गौरव पुंजवानी, विराज शिंदे, राज अशी आरोपींची नावे आहेत. यात पुंजवानी आणि शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तर राज हा पळून जाण्यात यशस्वी झाला. हे तिघे देखील पार्टीतून घरी जात होते. या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. हे तिघे देखील चांगल्या कुटूंबातील आहे. या बाबतची माहिती निरिक्षक सुशील कांबळे यांनी दिली आहे.

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

Loading...
You might also like