पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकमुळे 3 वाहनांचा अपघात

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मुंबई- अहमदाबाद महामार्ग टोल नाक्या जवळील ब्रिजवर पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकमुळे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे टोल नाका इथे हा अपघात घडला.

पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून एका ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, पंक्चर काढण्यासाठी ट्रकला जॅकवर उभा होता. धडकेतनंतर ट्रक जॅकवरून घसरुन समोरून येणार्‍या मारुती सुझुकीच्या कारवर धडकला. या धडकेत गाडी दोनदा पलटी झाली. मात्र सुदैवाने या गाडीतील चालक बचावला आहे.

विचित्र अपघातात पंक्चर काढणारा राजेश खर्डे हा चालक चिरडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. धडक दिलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.