धावपट्टीवरील कुत्र्यांमुळे विमानाला आकाशातच घालाव्या लागल्या ‘घिरट्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अचानकपने एखादा कुत्रा गाडीसमोर आला तर आपल्याला गाडी चालवताना खूप मोठा व्यत्यय येतो त्यामुळे मोठा अपघात होण्याचेही चान्सेस खूप असतात. रस्त्यावर गाडी चालवताना अनेकजण खबरदारीही घेतात मात्र एअरपोर्टवर कुत्र्यांमुळे एक मोठी घटना घडली आहे, गोव्याच्या दाबोली विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक ५-६ कुत्र्यांनी मुक्तसंचार सुरू केल्याने एअर इंडियाच्या विमानाच्या लँडिंगचा प्रयत्न फसला आणि विमानाला आकाशात घिरट्या घालाव्या लागल्या.

हे विमान मुंबईहून गोव्याला रवाना झाले होते. मात्र दाबोली विमानतळाच्या धावपट्टीवर पाच ते सहा कुत्रे आले. त्यामुळे या विमानाची लँडिंग होऊ शकली नाही. अशी माहिती विमानातील एका प्रवाशाने दिली आहे. हे विमानतळ नौदलाच्या ताब्यात असून नौदलाचा तेथे हवाईतळ आहे.

धावपट्टीवरील कुत्र्यांमुळे पायलटने धावपट्टीवर विमान उतरण्याच्या काही सेकंद आधी विमानाचे लँडिंग थांबवले. त्यानंतर पुन्हा उड्डाण करून १५ मिनिटानंतर विमानाचे लँडिंग केले.

आरोग्यविषयक वृत्त