‘हे’ 5 दिग्गज मुंबईतील सर्वात महागड्या घरांचे ‘मालक’, किंमत ऐकून उडेल ‘भंबेरी’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई देशातील सर्वात महागडी आणि आलिशान सिटी आहे. मुंबईमध्ये तुम्हाला अनेक मोठं मोठ्या आणि महागड्या इमारती दिसतील. देशात अनेक श्रीमंत व्यक्ती मुंबईत राहतात. आज आपण अशा श्रीमंत लोकांबाबत जाणून घेणार आहोत जे मुंबईमध्ये सर्वात महागड्या घरात राहतात.

1. मुकेश अंबानी
मुकेश अंबानी यांचे नाव देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट केले जाते. मुकेश अंबानी यांचे प्रसिद्ध घर मुंबईमध्ये आहे ज्याचे नाव एंटीलिया हाउस असे आहे आणि या इमारतीची आजची किंमत साधारण 12 हजार 500 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.

2. अनिल अंबानी
अंबानी घरातील असल्यामुळे अनिल हे देखील खूप श्रीमंत व्यक्तिमत्व आहे. पाली हाऊस म्हणून यांचे घर मुंबईमध्ये ओळखले जाते आणि या इमारतीची किंमत 5 हजार कोटी इतकी आहे.

3. साइरस पूनावाला
यांचे नाव देखील देशातील गर्भ श्रीमंतांच्या यादीत जोडले गेलेले आहे. यांच्या मुंबईतील घराचे नाव लिंकन हाऊस असे आहे आणि याची किंमत 750 कोटी इतकी आहे.

4. आनंद पिरामल
या यादीच्या चवथ्या क्रमांकावर असलेली व्यक्ती देखील खूप श्रीमंत आहे विशेष म्हणजे आनंद हे मुकेश अंबानींचे जावई आहेत. पिरामल हाऊस असे त्यांच्या घराचे नाव असून त्याची किंमत 450 कोटी इतकी आहे.

5. कुमार मंगलम बिरला
यांच्या घराचे नाव जातला हाऊस असे आहे. कुमार यांची ओळख देखील देशातील सर्वात श्रीमंत म्हणून सर्वांना माहित आहे. त्यांच्या घराची किंमत जवळ जवळ 425 कोटी एवढी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/