मुंबईत Lockdown मध्ये अंशत: शिथिलता; लोकल मात्र तुर्तास बंद राहणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लॉकडाऊन Lockdown काही प्रमाणात शिथिल केलं आहे. यावरून राज्यात पाच टप्प्यामध्ये अनलॉकला शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच आता, मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात असल्याने येथे काही अंशत: निर्बंध शिथिल केले जाणार आहे.

छत्रपती संभाजीराजेंचे आवाहन, म्हणाले – ‘राज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा, माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा’

मुंबई, मुंबई उपनगर, दुसऱ्या टप्प्यामध्ये असल्याने मुंबईची लोकल मात्र, तुर्तास सुरू होणार नाही. या टप्प्यात निर्बंध पूर्णपणे शिथील करणार नसून अंशत: शिथिल होणार आहे. दर शुक्रवारी जिल्ह्याच्या आकडेवारीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. पाच टप्प्यात राज्यातील लॉकडाऊनमध्ये Lockdown शिथिल करणार आहे. जमावबंदी-संचारबंदी पहिल्या टप्प्यात राहणार नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात संचारबंदी-जमावबंदी राहणार आहे. पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतूकीस परवानगी असेल. पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने व्यवहार सुरू होणार आहे.

Maharashtra Unlock : ‘राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, अजून अनलॉक केलेला नाही’ विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

पॉझिटिव्हीटी रेट ५ % आहे आणि प्राणवायू बेड्स २५ टक्क्यापर्यंत आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन राहणार नाही.
यामध्ये रेस्टॉरंट, मॉल्स, खुलं मैदान, सलून, जीम, खासगी-सरकारी कार्यालये १०० % उपस्थितींनी सुरु होईल.
तसेच, सास्कृतिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांना १०० % लोकांना परवानगी आहे.
दुसऱ्या टप्प्यात ५० % लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत हे निकष आहेत. या घडीला मुंबई लोकल सेवा बंद असणार आहे. शुक्रवार पर्यंत जर पॉझिटिव्हीटी रेट कमीच राहीला तर मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती राज्याचे मदत पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले