अभिनेते नवतेज हुंडल यांच्या निधनाचा संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय सेनेद्वारे पाकव्याप्त काश्मिरमध्ये सर्जिकल स्ट्राइकवर केलेल्या सिनेमात काम करणाऱ्या नवतेज हुंडल या अभिनेत्याचे निधन झाले आहे. अचानक नवतेज यांच्या मृत्युनंतर संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. या अभिनेत्याची दुःखद निधनाची बातमी सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली आहे.

या अभिनेत्याने ‘ उरी – द सर्जिकल स्ट्राइक’  सिनेमात काम केले आहे.  या सिनेमात त्यांनी गृहमंत्र्याची भुमिका केली आहे. यावेळी सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन कडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंटा ने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये लिहले आहे की, नवतेज हुंडल यांच्या निधनांचे शोक व्यक्त करत आहे. त्यांचे अंत्यसंस्कार ओशीवरा क्रिमटोरियम रिलीफ रोड, प्रकाश नगर ज्ञानेश्वरनगर जोगेश्वरी (प) येथे पार पडले.